राज्य गृहनिर्माण खात्याच्या अखत्यारीत असलेल्या शहरानजीकच्या देवराज अर्स कॉलनीला आता बेळगाव महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.
बेळगाव उत्तरचे आमदार अॅड.अनिल बेनके यांच्या विशेष प्रयत्नामुळे राज्य गृहनिर्माण खात्याच्या अखत्यारीत असलेल्या देवराज अर्स कॉलनीला आता महापालिकेच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे.
राज्य गृहनिर्माण खात्याच्या अधिकाऱ्यांकडून शनिवारी आमदार अॅड. अनिल बेनके यांच्यासमक्ष देवराज अर्स कॉलनीची कागदपत्रे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे हस्तांतरित करण्यात आली. यापूर्वी राज्य गृहनिर्माण खात्याच्या ताब्यात असणारी देवराज अर्स कॉलनी विकास कामांपासून वंचित होती. परिणामी येथील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्यामुळे आपल्या कॉलनीला महापालिकेच्या ताब्यात द्यावे अशी मागणी केली जात होती.
देवराज अर्स कॉलनीच्या विकासासाठी आमदार अॅड. अनिल बेनके यांनी 6 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करून घेतले असून यातून विविध विकास कामे राबविले जाणार आहेत. आपल्या कॉलनीचे महापालिकेकडे हस्तांतरण झाल्यामुळे देवराज अर्स कॉलनीतील नागरिकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.