बेळगावच्या गुन्हे आणि वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त यशोदा वंटगोडी यांना मुख्यमंत्र्यांचे पदक जाहीर झाले आहे.त्यांनी आजवर पोलीस खात्यात बजावलेल्या सेवेची दखल घेऊन हे पदक जाहीर करण्यात आले आहे.बेळगावात उपायुक्त म्हणून सेवा बजावताना त्यांनी गुन्हे रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत.
गुन्हे घडू नयेत म्हणून जनतेत देखील जागरूकता निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले आहे.अनेक संस्थांच्या सामाजिक उपक्रमाला उपस्थित राहून त्यांनी मार्गदर्शन केले आहे.
सध्या अनेक ठिकाणी शहरात रस्त्याची कामे सुरू असून एका बाजूने अनेक ठिकाणी वाहतूक सुरू आहे.ही वाहतूक देखील सुरळीत चालावी आणि जनतेला,वाहनचालकांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.
शहरारातील वाहतूक व्यवस्था देखील त्यांनी सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.