कोरोनामुळे लॉक डाऊन असल्याने राष्ट्रीय आहार सुरक्षा अंत्योदय आणि बीपीएल धारकांना एप्रिल आणि मे महिन्याचे रेशन मिळूनच द्यावे असा आदेश जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळ्ळी यांनी बजावला आहे.
रेशन दुकानदारांनी सकाळी सात ते बारा आणि दुपारी चार ते रात्री आठ या वेळेत सामाजिक अंतर राखून धान्य वितरण करावे.मंगळवार आणि राष्ट्रीय सुट्ट्यांचे दिवस वगळून रेशन दुकानदारांनी अन्य सगळ्या दिवशी धान्याचे वितरण करावे.
रेशन मिळण्यात समस्या उदभवली तट 1967 या टोल फ्री नंबरवर नागरिकांनी तक्रार करावी.रेशन दुकानदारांनी इंटरनेट किंवा अन्य सबब सांगून कार्ड धारकाकडून कोणतीही रक्कम वसूल करायची नाही.अधिक पैसे घेतल्याची तक्रार आल्यास दुकानदारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळवले आहे.
सकाळी 8 ते 12 दुपारी व सायंकाळी 4 ते 8 पर्यंत सोशल डिस्टन्स पाळत वितरित करावे अश्या सूचना देखील डी सी बोंमनहळळी यांनी केल्या आहेत.