लॉक आउट मधून अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या व्यक्तींना सूट देण्यात आली असून त्यांना अडवू नये अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
पोलीस देखील लॉक डाऊन अंमलबजावणी करत आहेत.पण एका आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी बेशुद्ध पडेपर्यंत लाठीने मारहाण करून त्याचा हात मोडल्याची घटना बेळगाव जवळील राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे.
आरोग्य खात्याचे कर्मचारी बसू डोल्ली हे राष्ट्रीय महामार्ग क्र 4 वरून जात होते.त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवले.बसू हे पोलिसांना आपण आरोग्य खात्याचा कर्मचारी आहे असे सांगत होते पण ते न ऐकता पोलिसांनी बसू यांना जबर मारहाण केली.या मारहाणीत बसू यांचा हात मोडला आहे.
पोलिसांनी लॉक डाउन ची अमंलबजावणी यशस्वी करण्यासाठी बेळगावात अनेक ठिकाणी लाठी हल्ला केला आहे कारण नसताना घरा बाहेर फिरणाऱ्यांना चोप दिलाय मात्र अनेक सेवा बजावणाऱ्या याचा फटका बसला आहे.केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार आणि आरोग्य अधिकाऱ्यांना कर्फ्यु लॉक डाउन मध्ये सूट ध्या अश्याया सूचना केल्या होत्या मात्र अनेक ठिकाणी आरोग्य अधिकाऱ्यांना मार खावे लागत आहेत.
पोलिस आपली duty करत आहेत.. पण लाठी हल्ला करण्या अगोदर समोरच्या माणसाची बाजू ऐकण्या अगोदर बेदम मारहाण करत आहेत…
निदान पोलिस लोकानी ऐकून घ्यावे अशी विनंती करतो मी… कारण माणसाला आपली आणि समाजाची नसली तरी आपल्या परिवाराची काळजी असते.. मुद्दाम म्हणुन कोण बाहेर नाही फिरणार..