कोरोना या प्राण घातक रोगाच्या प्रवेशामुळे देशात राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्यात आली असून आठ दिवस शाळा कॉलेजना सुट्टी व सार्वजनिक कार्यक्रमातवर बंदी घालण्यात आली आहे.
आता इयत्ता सातवी आठवी आणि नववीच्या देखील परीक्षा 31 मार्च पर्यन्त पुढे ढकलण्यात आल्या आहेत.कर्नाटकचे शिक्षण मंत्र्यांनी तसा आदेश बजावला आहे.
जनतेच्या आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने सुट्टीचा आदेश बजावला आहे. उद्या पासून सातवीच्या परीक्षा सुरू होणार होती आता शिक्षण खात्याने सदर परीक्षा पुढे ढकलली आहे.