कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व बार अँड रेस्टॉरंट, क्लब्स आणि देशी दारू दुकाने आज शनिवार दि. 21 मार्च रोजी दुपारी 4 वाजल्यापासून येत्या मंगळवार दि. 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तथापि सीएल 2 आणि एमएसआयएल ही दुकाने मात्र खुली राहणार आहेत,असे राज्याच्या अबकारी खात्याने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
*सलून चालकांचा बंद*
दरम्यान शहरातील सलून चालकांनी पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या “जनता कर्फ्यू”ला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे रविवारी 22 मार्च रोजी शहरातील सर्व सलून दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.
कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला असून त्याला आळा घालणे गरजेचे आहे. सलून व्यवसायाचा थेट ग्राहकांशी संबंधित असल्यामुळे नाभीक समाजबांधवांना सर्वात जास्त धोका आहे. त्यासाठी शहापूर, वडगावं, खासबाग व बेळगाव विभागातील सर्व सलून दुकाने रविवार दि. 22 मार्च रोजी स्वयंस्फूर्तीने बंद करून शासनाला सहकार्य करण्याचा निर्णय श्री संत सेना महाराज समाजोन्नती संघ गाडेमार्ग शहापूर आणि सलून व्यावसाईक संघटना, शहापूर बेळगाव यांनी घेतला आहे. तरी सर्व सलून दुकानदारांनी व ग्राहकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सचिव संतोष शिवनगेकर व अध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी केलं आहे.
उद्या रविवारी बेळगाव शहरातील मटण विक्री दुकान देखील बंद ठेवली जाणार आहेत