महाराष्ट्र एकीकरण कार्यकर्ते सूरज कणबरकर यांना कोरोना झालाय त्यांच्यावर के एल ई रुग्णालयात उपचार सुरू आहेत असा खोटा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेला युवक कुणी दुसरा नसून सुरज यांचा चुलत भाऊ आहे. त्यांच्या काकांच्या मुलानेच हे कृत्य केलं आहे मेघन अशोक कणबरकर रा.गांधीनगर बेळगाव असे त्याचे नाव आहे.
बेळगावात सूरज यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्या वर के एल ई इस्पितळात उपचार सुरू आहेत असा मेसेज तयार करून अनेक व्हाट्स अप्प ग्रुप वर पाठवला होता त्यानंतर सुरज यांच्या कडे अनेकांनी फोन करून विचारणा केली त्यांची नाहक बदनामी झाली होती त्यानंतर त्यांनी माळ मारुती पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी सायबर द्वारे माहिती घेत आरोपीचा शोध लावला.
कोरोना संशयितांची सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यावर पोलिसांनी विशेष नजर ठेवली आहे.सुरज यांच्यावर त्यांचा चुलत भाऊ मेघन यांच्या कुटुंबात मालकी संपत्ती वरून वाद आहे त्या वादाच्या रागातून सूरज यांची बदनामी करण्यासाठी ही पोस्ट घातली असल्याचा आरोप देखील झाला होता.
एकीकडे जिल्हाधिकारी यांनी कोरोना बाबत चुकीची बदनामी करणाऱ्यावर कठोर कारवाईचे आदेश दिलेले असताना माळ पोलिसानी गंभीर गुन्हा न दाखल करता बेलेबल गुन्हा दाखल केलाय असा आरोप सूरज यांनी केला आहे