कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींची तपासणी करण्यास प्रारंभ केला आहे.महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णाची संख्या वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने कोगनोळी येथे महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यास प्रारंभ केला आहे.
बस,टेम्पो,खासगी वाहनातून येणाऱ्या सगळ्या व्यक्तीची तपासणी करून मगच त्यांना सोडण्यात येत आहे.वैद्यांचे एक पथक तेथे कार्यरत आहे.
गोव्याहून येणाऱ्या व्यक्तींची देखील कणकुंबी येथे तपासणी केली जात आहे.गोव्याहून बेळगावला ये जा करणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे.त्यामुळे आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. एकूणच कोरोना बाबत बेळगाव जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे
गोवा आणि महाराष्ट्र दोन्ही सीमेवर मेडिकल चेक पोस्ट द्वारे कर्नाटककडे येणाऱ्यांची तपासणी केली जात आहे.