बेळगावचे प्रख्यात चित्रकार शिरीष देशपांडे यांनी रंगीत बॉलपेनचा वापर करून श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांचे पोर्ट्रेट साकारले आहे.लाल,पिवळ्या,तपकिरी आणि काळ्या रंगांच्या बॉलपेनचा वापर त्यांनी केला आहे.
अठरा दिवसात ऐशी तास हे पोर्ट्रेट पूर्ण करण्यासाठी लागले.शंभर टक्के कॉटन फायबर पांढऱ्या रंगाच्या हॅन्डमेड पेपरचा वापर करण्यात आला आहे.22 बाय 30 इंच आकाराचे हे पोर्ट्रेट असून हे पोर्ट्रेट शिरीष देशपांडे यांच्या आगळ्यावेगळ्या शैलीची आणि कौशल्याची साक्ष देते.
चेहऱ्यावरील भाव आणि डोळ्यातील आपुलकीची भावना पोर्ट्रेटमध्ये रेखाटणे आव्हानात्मक होते.पंत महाराजांचे केवळ ब्लॅक अँड व्हाईट फोटो उपलब्ध असल्यामुळे त्यांच्या त्वचेचा रंग कल्पनेने उतरवला.
पंत महाराजांचे कुरळे केस रेखाटणे देखील आव्हानच होते असे चित्रकार शिरीष देशपांडे यांनी सांगितले.