केपीसीसी कार्याध्यक्ष आणि आमदार सतीश जारकीहोळी यांनी आपल्या मतदार संघातील अनेक गावांत कोरोना विषयी जनजागृती करून दहा हजार वाशेबल मास्कचे वितरण केले.
काकती,होनगा,वंटमुरी,हेब्बाळ आणि यमकनमर्डी गावात मास्कचे वितरण केले.तसेच गावागावात फॉग मशीनद्वारे फवारणी करून ब्लिचिंग पावडर घालण्यात आली.
केंद्र आणि राज्य सरकारने कोरोनाचा नायनाट करण्यासाठी विविध उपाय योजना करण्यात आल्या आहेत.सरकार ने घालून दिलेल्या नियमांचे जनतेने पालन करावे.जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्यवस्थित करण्यासाठी सरकारने नियोजन केले आहे.
लोकांनी घाबरून न जाता नियमांचे पालन करून कोरोनाचा नायनाट करण्यासाठी सहकार्य करावे.कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन आमदार सतीश जारकीहोळी यांनी केले आहे.