कोरोनाच्या धास्तीमुळे एकीकडे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी राज्यात आठ दिवस कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम करू नयेत, शंभरहून अधिक लोक विवाहा सारख्या कार्यक्रमात एकत्रित येऊ नये., या आपल्याच आदेशाचे स्वतःच उल्लंघन केलं आहे.
रविवारी ते बेळगाव उद्यमबाग येथील शगुन गार्डन येथे आमदार महंतेश कवाटगीमठ यांच्या कन्येच्या विवाह कार्यक्रमात सहभागी झाले होते.राज्य सरकारने विवाह कार्यक्रमात अधिक लोक सहभागी होऊ नये असा आदेश बजावला होता. त्या आपल्या आदेशाला त्यांनी वाटण्याच्या अक्षता लावल्या आहेत.
पत्रकारांनी त्यांना विवाह कार्यक्रमात सहभागी होऊन आपण आपल्याच आदेशाच उल्लंघन केल्या बद्दल प्रश्न विचारला असता, त्यांचे तत पप झाले व कोणतीच प्रतिक्रिया न देता ते निघून गेले. मात्र मुख्यमंत्र्यांनी आदेशाचे उल्लंघन केल्याची चर्चा मात्र सर्वत्र रंगली होती.
आमदार कवटगीमठ यांनी साधेपणाने विवाह करू असे जाहीर केले होते मात्र हा विवाह गर्दीत झाल्याने त्यांनीही शासकीय आदेश मोडला याबाबत चर्चा सुरू आहे.
एका आठवड्यात परिस्थिती नियंत्रणात येईल राज्यात 100 हुन अधिक कोरोना संशयिता वर आरोग्य खाते लक्ष ठेऊन आहे, असे त्या अगोदर विमान तळावर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले.राज्यात 6 जण कोरोना बाधित आहेत आरिघ6 खाते यासाठी सज्ज असून लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल असे ते म्हणाले.
गृहमंत्री बसवराज बोंमई,मंत्री श्रीमंत पाटील,शशिकला जोलले, खासदार शोभा करंदलाजे,खासदार प्रभाकर कोरे,माजी मंत्री उमेश कत्ती आदी उपस्थित होते.