टिळकवाडी पहिला रेल्वे गेटनजीक रेल्वे मार्गाशेजारी बांधण्यात आलेल्या बेळगाव महापालिकेच्या 49 दुकान गाळ्यांपैकी कांही गाळ्यांचा बेकायदेशीर ताबा कांही व्यापाऱ्यांनी घेतला आहे. विशेष म्हणजे महापालिकेने ठोकले टाळे काढून त्या गाळ्यांमध्ये त्यांनी आपले साहित्य ठेवून संबंधित गाळ्यांना स्वतःचे कुलूप लावले आहे. या घुसखोरांना हाकलण्याचे आव्हान सध्या महापालिकेसमोर आहे.
आता कला मंदिराच्या बाजूच्या दुकान गाड्यांवर कारवाई झाल्यामुळे मास्टर प्लॅन मधील विस्थापितांचे सातपूर ते पुनर्वसन या 49 गाड्यांमध्ये केले जाणार आहे पण त्यासाठी प्रथम महापालिकेला या 49 गाड्यांचा पुन्हा ताबा घ्यावा लागणार आहे महापालिकेने कलामंदिर शेजारील दुकानदार आणि भाजी विक्रेत्यांना हटविताना त्यांना त्यांचे साहित्य ठेवण्यासाठी रेल्वेमार्गाचा शेजारील महापालिकेचे दुकान गाळे वापरा असे सांगण्यात आले आहे तथापि त्या गाड्यांचा काही व्यापाऱ्यांनी बेकायदेशीर ताबा घेऊन आपल्या गाड्यांना त्यांनी टाळे ठोकले असल्यामुळे महापालिकेची गोची झाली आहे.
टिळकवाडी येथील कलामंदिर शेजारील गाळेधारक महापालिकेच्या 49 दुकान गाड्यांमध्ये जाणार की नाहीत याबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही संबंधित दुकानदार आणि भाजी विक्रेत्यांचे तात्पुरते पुनर्वसन होणार असले तरी तेथे वीज जोडणी व अन्य सुविधा देण्याची त्यांची मागणी आहे त्याबाबत मनपा आयुक्त जगदीश यांच्या निर्णयानंतर तसेच संबंधित दुकान गाळ्यांचा आधीच ताबा घेतलेल्या गाळेधारकांनी संमती दिल्यास पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू होणार आहे. एकंदर वस्तुस्थिती अशी आहे की महापालिकेच्या या गाळ्यांमधील घुसखोरांना बाहेर काढण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे.