वैभवनगर बॉक्साईट रोड या रस्त्याशेजारी गटारी आणि पाईपलाईनसाठी खोदलेली चर ठिक-ठिकाणी पूर्णता बुजवलेली नसल्यामुळे निर्माण झालेले खड्डे सध्या धोकादायक बनले आहेत.
वैभवनगर बॉक्साईट रोड या रस्त्याशेजारी गटारी आणि पाईपलाईनसाठी चर खोदण्यात आली होती. या ठिकाणचे विकास काम पूर्ण झाल्यानंतर खोदलेली सदर चर व्यवस्थितरित्या बुजवण्यात आलेली नाही. परिणामी रस्त्याशेजारी ठिकाणी खड्डे निर्माण झाले असून कांही ठिकाणी गटारीचे चेंबर खुले ठेवण्यात आले आहेत.
वैभवनगर, बॉक्साईट रोड हा रस्ता वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्यावर अवजड वाहनांसह दुचाकी आणि चारचाकी वाहनांची सतत ये – जा सुरू असते. तेंव्हा सध्या रस्त्याशेजारी निर्माण झालेले खड्डे वाहन चालकांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या खड्ड्यांमुळे दिवसा ठीक आहे, परंतु रात्रीच्या वेळी अंधारात या मार्गावर दुर्घटना घडू शकते. तेंव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन वैभवनगर बॉक्साइट रोड शेजारी खोदलेली चर व्यवस्थित बुजवण्याची जोरदार मागणी केली जात आहे.