Sunday, December 29, 2024

/

हातात फलक घेत करून घेतले उपचार

 belgaum

बेळगाव पोलिसांच्या लाठी हल्ल्याला अजूनही लोक घाबरलेले नाहीत ते बाहेर पडताहेत अनेकांना लाठीचा मार बसत आहे मात्र कुत्र्याने चावा घेतलेल्या एका व्यक्तीने लाठी न खाता घरा बाहेर सिव्हिल इस्पितळात जाऊन उपचार करून घेतले.

लॉक डाऊनमुळे उपचार घ्यायला घराबाहेर पडणे देखील अवघड झाले आहे.पण कुत्रे चावलेल्या खानापूरच्या व्यक्तीने मात्र खानापूरहून बेळगाव पर्यंत पोलिसांची एकही लाठी न खाता सुखरूप प्रवास करून जिल्हा रुग्णालयात उपचार करून घेतले.

कुत्रा चावलेल्या व्यक्तीने बेळगावला येताना आपल्या दुचाकीला समोर एक फलक बांधला.या फलकावर मला कुत्रा चावला असून मी उपचारासाठी निघालो आहे असे त्यावर लिहिले होते.वाटेत अनेक ठिकाणी पोलीसानी अडवले पण पोलिसांना सांगून तो सुखरूप जिल्हा रुग्णालयाला पोचला.

लाठी न खाता खानापूर हुन बेळगावला येत उपचार करून घेतलेल्या या व्यक्तीचे बुद्धीचे कौतुक होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.