दुबई टूरला गेलेल्या ग्रुपमधील काही लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे खळबळ माजली आहे. या ग्रुप मधून बेळगावचे तीन जण देखील या ग्रुपमधून दुबईला गेले होते अशी माहिती समोर येत आहे.
या ग्रुपमधील पुण्याचे एक दांपत्य आणि त्यांच्या मुलीला कोरोना संसर्ग झाला असून मुंबईच्या दोघांना देखील कोरोना संसर्ग झाला आहे.या ग्रुपमध्ये मुंबई,पुणे,पिंपरी चिंचवड,नागपूर,बीड,ठाणे,अहमदनगर,रायगड आणि बेळगावच्या व्यक्तींचा समावेश होता.
23 फेब्रुवारी रोजी हा ग्रुप दुबईला गेला होता.दुबईहून हा ग्रुप 1 मार्च रोजी भारतात परतला.त्यावेळी काही जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे तपासणीत आढळून आले आहे.मुंबईचे दोघे आणि पुण्याचे तिघे यांना तपासणीत कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.दुबईला गेलेल्या ग्रुपमधील सगळ्या सदस्यांची माहिती सरकारने मागवली आहे.
आज तक सह अनेक राष्ट्रीय आघाडीच्या वृत्त वाहिन्यानी त्या ग्रुप मधून बेळगावचे तिघे देखील दुबई फिरायला गेल्याचे वृत्त जरी दिल असलं तरी बेळगाव जिल्हा प्रशासनाला याबाबत अध्याप कल्पना नाही आहे.बेळगावात एकही कोरोना संशयित नसल्याचे प्रशासनाने जाहीर केलं आहे.ते तिघे कोण आहेत ते बेळगावात आहेत की अन्यत्र कुठं याबाबत देखील माहिती समजलेली नाही.