दिल्ली येथे तब्लिक जमातीच्या निजामुद्दीन मरकज कार्यक्रमास उपस्थित राहण्यास गेलेल्या बेळगावच्या 10 जणांना होमकाॅरन्टाईन देण्यात आले असून कोरोनाच्या निदानासाठी त्यांच्या घशातील स्वॅब प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी यांनी मंगळवारी दिली.
दिल्ली येथे नुकतेच तब्लिक जमातीच्या निजामुद्दीन मरकज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात बेळगावच्या दहा मुस्लिम बांधवांसह देशभरातील 1400 जणांनाचा सहभाग होता. देशभरातील कोरोना विषणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तब्लिक जमातीच्या निजामुद्दीन मरकज कार्यक्रमात भाग घेतल्यामुळे या सर्वांना होमकाॅरन्टाईन देण्यात आले आहे. यापैकी बेळगावच्या दहा जणांना 14 दिवसाचे होमकाॅरन्टाईन देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डाॅ. बोमनहळ्ळी यांनी आज मंगळवारी दिली.
दरम्यान, होमकाॅरन्टाईन देण्याबरोबरच बेळगावातील संबंधित 10 जणांच्या घशातील द्रावाचे अर्थात स्वॅबचे नमुने कोरोना तपासणीसाठी बेंगलोर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असल्याची माहिती डॉ. तुक्कार यांनी दिली आहे.
मंगळवार 31 मार्चचे आरोग्य खात्याचे मेडिकल बुलेटिन दहा होम क्वांरंंटाइन वाढले
आता पर्यंत निरीक्षणाखाली असलेल्या रुग्णांची संख्या -396
14 दिवसासाठी घरात विलगीकरणं केलेल्यांची संख्या -229
हॉस्पिटलमध्ये विलगीकरणं झालेल्यांची संख्या -03
14 दिवस विलगीकरणं संपलेल्याची संख्या-131
28 दिवस विलगीकरणं संपलेल्यांची संख्या -33
एकूण नमुन्यांची तपासणी- 21
निगेटिव्ह नमुने -18
कोरोना पोजिटिव्ह नमुने -00