दीड वर्षानंतर होणार सीमाप्रश्नाची सुनावणी
कर्नाटक महाराष्ट्र आणि संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या सीमा प्रश्नाची सुनावणी येत्या 17 मार्चला सर्वोच्च न्यायालयात होणार आहे .
तब्बल दीड वर्षे लांबलेला ही सुनावणी आता 17 मार्चला होणार असून या तारखेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेले आहे. महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात दावा दाखल करून कर्नाटकात असलेल्या 865 खेड्यांवर आपला हक्क मागितला आहे. त्याला कर्नाटक विरोध करत आहे .
विशेषता कर्नाटकाने हा दावा अस्तित्वात येतच नाही ,सीमाप्रश्न संपलेला आहे तेव्हा महाराष्ट्राने केलेली मागणी चुकीची असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयात व्यक्त केले असल्यामुळे सुनावणी लांबत आहे. मूळ दाव्याला सुरुवात होण्यापूर्वी कर्नाटकाच्या पोट दाव्यावर सुनावणी कधी होणार हा प्रश्न असून येत्या 17 मार्चला होणाऱ्या सुनावणीत महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकाच्या हातात काय लागणार याकडे लक्ष लागलेले आहे .