सोयी व वातावरण नाही. तसेच भूमी संपादन ही मोठी समस्या आहे. यामुळे बेळगाव विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देणे कठीण आहे. याबद्दल फुकटचे आश्वासन देणे सोपे आहे पण ते फक्त राजकीय विधान होऊ शकते प्रत्यक्षात येणे कठीण आहे. अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री आणि बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांनी दिली आहे.
हुबळी ऐवजी बेळगाव विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून द्या अशी मागणी जोरात केली जात आहे. याबद्दल बोलताना अंगडी यांनी ही माहिती दिली आहे. आम्ही सरकारी कामांसाठी बेळगावच्या जमिनी अनेकवेळा दिल्या आहेत. राणी चन्नम्मा विद्यापीठासाठी, व्हिटीयु, रस्ते यासाठी जमिनी घेतलेल्या आहेत. शेतकऱ्यांकडे आणखी जमीन मागितली तर ते आपल्याला सोडणार नाहीत.
आपण स्वतः खासदार प्रल्हाद जोशी यांच्या समवेत उत्तर कर्नाटकात एक आंतरराष्ट्रीय विमानतळ करून द्या अशी मागणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. हुबळी येथे सुविधा असल्याने तेथे हा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न केले आहेत. बेळगावमधून थेट दिल्ली ला विमान सुरू होण्यासाठीही आपण प्रयत्न करत आहोत असेही त्यांनी सांगितले.