कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सरकारने नऊ जिल्ह्यात लॉक डाऊनची घोषणा केली आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सरकारने ही उपाय योजना केली आहे.
बेळगाव जिल्ह्यात देखील लॉक डाऊन आहे.त्यामुळे जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी म्हणून 23 मार्च ते 27 मार्च पर्यंत एपीएमसी भाजी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तरी शेतकरी बांधवांनी या कालावधीत आपला भाजीपाला मार्केटमध्ये विक्रीसाठी आणू नये.व्यापारी आणि शेतकरी यांनी याची नोंद घ्यावी असे एपीएमसीने कळवले आहे.