माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या प्रयत्नातून निर्माण झालेल्या काँग्रेस कार्यालयाच्या इमारतीचे काम पूर्णत्वास गेले असून त्याचे उदघाटन माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते 14 मार्च रोजी सकाळी 11 वाजताहोणार आहे.सतीश जारकीहोळी पालकमंत्री असताना काँग्रेस कमिटी कार्यालयासाठी मनपा कडून जागा घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
प्रस्ताव आल्यानंतर चोवीस तासात मनपा कडून जागा मंजूर करून घेण्यात जारकीहोळी यशस्वी झाले होते.मनपा कडून जागा खरेदी करण्यासाठी जिल्ह्यातील विद्यमान आमदार,माजी आमदार आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मदत केली होती.
विनय नावलगट्टी यांनी बेळगाव जिल्हा काँग्रेसचा पदभार स्वीकारल्यावर कार्यालयाच्या बांधकामाला प्रारंभ झाला होता आता ते काम पूर्णत्वाला गेले असून त्याचे उदघाटन 14 रोजी होणार आहे.शहरातील आर टी ओ सर्कल जवळ काँग्रेस कार्यालय उभारण्यात आले आहे.
फुलबाग गल्ली,क्लब रोड या ठिकाणी देखील व काँग्रेस कार्यालये आहेत आता आर टी ओ सर्कल जवळ मुख्य कार्यालय असणार आहे.