कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर बेळगाव विमानतळावरील प्रवाशांच्या संख्येत कमालीची घट झाली असली तरी काही विमान कंपन्यांनी विविध ठिकाणच्या आपल्या विमानसेवा अद्याप सुरू ठेवले आहेत. त्याचप्रमाणे कांही कंपन्यांनी आपल्या विमान सेवा रद्द केल्या आहेत, तर काहींनी आपल्या वेळापत्रकात बदल केला आहे.
ट्रू जेट कंपनी : ट्रू जेटच्या बेळगावहून हैदराबाद, कडप्पा, तिरुपती व म्हैसूर येथील विमानसेवा सुरू आहेत. स्पाईस जेट कंपनी : स्पाईस जेटची बेळगावहून मुंबई आणि बेंगलोर येथील विमान सेवा सुरू आहे. तथापि बेळगाव – हैदराबाद ही विमान सेवा मात्र आज सोमवार 23 मार्चपासून रद्द करण्यात आली आहे. इंडिगो कंपनी : इंडिगो एअरची बेळगाव ते बेंगलोर आणि बेळगाव ते हैदराबाद विमान सेवा कोणत्याही बदला विना सुरू आहे.
स्टार एअर कंपनी : स्टार एअरच्या बेळगावहून मुंबई, अहमदाबाद आणि इंदूर येथील विमानसेवा नेहमीप्रमाणे कार्यरत आहेत. तथापि बेंगलोरच्या आपल्या सर्व विमानसेवा स्टार एअरने येत्या 30 मार्चपर्यंत रद्द केले आहेत. अलाईन्स कंपनी : अलाईन्स एअरने मात्र बेंगलोर – बेळगाव – पुणे आणि पुणे – बेळगाव – बेंगलोर ही आपली विमानसेवा दि. 23 व 24 मार्च रोजी रद्द केली आहे.
दरम्यान, सर्व विमान कंपन्यांच्या बेळगाव ते बेंगलोर विमान सेवा रविवार दि. 29 मार्च ते 10 एप्रिल 2020 या कालावधीत रद्द करण्यात आल्या आहेत. तथापि पुणे येथील विमानसेवा मात्र नव्या वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहे. बेळगाव एअरपोर्ट ऍथॉरिटीने दिलेल्या माहितीनुसार स्पाइस जेटने आज सोमवारची बेळगाव – मुंबई विमानसेवा देखील रद्द केली आहे. बस सेवा आणि रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्या असल्यामुळे आता बेळगाव शहरवासियांसमोर सध्या विमान सेवा हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे.