बेळगाव हुन व्हाया इंदोर अजमेर विमानसेवा सोमवार पासून सुरू झाली आहे बेळगावहून राजस्थान मधील ऐतिहासिक शहर अजमेर(किशनगड) हवाई सेवेने कनेक्ट झाले आहे.स्टार एअरच्या या विमानसेवेने केवळ तीन तासांत बेळगावहून अजमेर ला पोहोचण शक्य झालं आहे. सुरुवातीला ही विमान सेवा आठवड्यातील तीन दिवस म्हणजे सोमवार मंगळवार आणि गुरुवार अशी असणार आहे.बेळगाव ते अजमेर1550 की मी प्रवास केवळ तीन तासांत होत आहे
असे आहे वेळा पत्रक इंदूर बेळगाव Indore Belgaum-17:55 19:35 MON, TUE, THU(सोम मंगळ गुरू)-Indore Kishangarh(ajmer) 15:00 16:05 MON, TUE, THU(सोम मंगळ गुरू)-Kishangarh Indore-16:30 17:35 MON, TUE, THurs (सोम मंगळ गुरू) belgaum to indore 1:15 pm to 2:30 pm
बेळगावहून पहिल्या दिवशी या विमान सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या दिवशी सोमवार 16 रोजी स्टार एअरच्या 50 सीटर विमानात बेळगाव हुन 18 जणांनी अजमेर प्रवास केला आहे
उडान तीन योजनेत स्टार एअर ने बेळगाव इंदोर हा रूट घेतला होता त्या नंतर आता हाच रूट अजमेर पर्यन्त वाढवण्यात आला आहे.इंदोर ते किशनगड या शहरातील रस्त्यावरचे अंतर 550 कि मी असून या विमान सेवेमुळे एक तासांत जाणे शक्य होणार आहे.किशनगड ते अजमेर 30 की मी अंतर आहे.
बेळगावहून मार्बल सिटी म्हणून मार्बल फरशी साठी प्रसिद्ध असणाऱ्या किशनगढ, याच शहरात असणारे लाल मिरचीची बाजारपेठ, अजमेर ख्वाजा मोइनोद्दीन चिस्ती दरगाह,पुष्कर ब्रह्म मन्दिर जाणाऱ्याना थेट विमानसेवा उपलब्ध झाली आहे.