बेळगाव जिल्ह्यातून एकूण 15 रुग्णांचे नमुने कोरोना तपासणीसाठी बंगळुरू प्रयोग शाळेला पाठवले होते त्यातील आज तिघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत आता केवळ एका रुग्णाच्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे.
आज पर्यंत एकूण 15 जणांचे नमुने पाठवलेलं त्यातील 14 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत असे जिल्हाधिकारी डॉ एस बी बोंमनहळळी यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यात शुक्रवारी दि. 27 मार्च 2020 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 350 संशयित व्यक्तींचे वैद्यकीय निरीक्षण करण्यात आली असून एकूण 307 जणांनी 14 दिवसांचा घरगुती विलगीकरण (आयसॉलेशन) कालावधी पूर्ण केला आहे.
भारताबाहेरील कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तींनी अथवा कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्यांनी त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळली नसली तरी भारतात आलेल्या दिवसापासून 14 दिवस घरगुती विलगीकरण होत रहावे, घराबाहेर पडू नये. त्याचप्रमाणे संबंधितांनी स्वतःहून नजीकच्या सरकारी हॉस्पिटल अथवा 104 हेल्थ – हेल्पलाईन कॉल सेंटरशी संपर्क साधून आपली माहिती द्यावी. नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्यावी. खोकला अथवा शिंक आल्यास टिश्शू पेपर किंवा रुमाल तोंडावर धरावा. प्रत्येकाने आपले हात साबण लावून पाण्याने अथवा सॅनिटायझरने वारंवार स्वच्छ धुवावेत. नागरिकांनी सार्वजनिक कार्यक्रमातील सहभाग शक्यतो टाळावा, आदी खबरदारीच्या सूचनाही जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण कार्यालयाच्या सर्व्हिलन्स युनिटने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहेत.