कोरोना संशयितांचे बंगलोरला पाठवलेल्या आठ पैकी पाच नमुने निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.आता अलीकडे पाठवलेल्या तीन रिपोर्टची प्रतीक्षा आहे.
आजवर बेळगावमधील 21 कोरोना संशयितांचे नमुने बंगलोरला प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.त्यापैकी आजपर्यंत 18 नमुने निगेटिव्ह आले आहेत.आता फक्त तीन रुग्णाच्या नामुन्याचा रिपोर्ट यायचा आहे.
शेजारच्या महाराष्ट्रात कोरोना ग्रस्तांची संख्या वाढत आहे बेळगाव जिल्ह्याला लागून असलेल्या सांगली जिल्ह्यात कोरोना ग्रस्तांची संख्या वाढत आहे या पाश्वभूमीवर बेळगाव जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्रातून सीमा सील केल्या आहेत बेळगाव गोवा मार्गावर चेक पोस्ट उभारण्यात आला आहे.
बेळगावात असलेल्या होम क्वारंटाईन वर पोलीस व आरोग्य खाते लक्ष ठेऊन आहे.बाहेर गावाहून खेडे गावात आलेल्यावर देखील आरोग्य खाते नजर ठेवून आहे.प्रारंभी व सुरुवाती पासूनच नियमांची काटेकोरपणे अंमल बजावणी केल्याने बेळगाव हे कोरोना मुक्त झाला आहे.