टिप्परने दुचाकीला दिलेल्या धडकेत पत्नी जागीच तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना बिजगरनी येथे घडली आहे.मंदा भारत पाटील वय 38 रा.मंडोळी असे या अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.तर मयत महिलेचा पती भारत पाटील हे जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंडोळीचे भारत पाटील हे कावळेवाडी येथील चव्हाटा देवीची यात्रेला जाऊन परतत होते त्यावेळी बिजगरनी येथील इंदिरा नगर प्राथमिक शाळे जवळ हा अपघात झाला.
भारत पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत तर मंदा यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. या अपघाताची ग्रामीण पोलीस स्थानकात नोंद झाली आहे.