Thursday, January 23, 2025

/

ट्रकची मोटार सायकलीला धडक युवक ठार

 belgaum

भरधाव ट्रकने मोटारसायकलला ठोकरल्याने गणेशनगर-हनुमाननगर येथील एका युवकाचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी हिंडलगा गणेश मंदिर पाठीमागे असलेल्या डबल रोडवर ही घटना घडली आहे.

महेश मोहन बनसे (वय 51 रा. गणेशनगर-हनुमाननगर) असे त्याचे नाव आहे. हिंडलगा गणेश मंदिरापासून हनुमाननगरकडे जाताना एमएच 04 सीयू 0450 क्रमांकाच्या ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात घडला. अपघातात गंभीर जखमी अवस्थेत केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळात हलविताना त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी महेश बनसे हा आपल्या दुचाकीवरून हिंडलगा गणेश मंदिरामागील डबल रोडवरून जात असताना एका भरधाव ट्रकने (क्र. एमएच 04 सीयू 0450) त्याच्या दुचाकीला मागून धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महेश बनसे याला रस्त्यावरून ये-जा करणार्‍या नागरिकांनी तातडीने इस्पितळात हलविले. तथापि दुर्दैवाने वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

महेश हा भाजपचा कार्यकर्ता होता सदर अपघाताची रहदारी उत्तर विभाग पोलीस स्थानकात नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.