गेल्या वर्षी आगष्ट महिन्यात विक्रमी पावसाने येळ्ळूर मधील प्रसिद्ध फुटुक तलाव फुटला होता होता त्यामुळे शेकडो एकर भात पिकाची जमीन पाण्याखाली गेली होती या फुटुक तलावाच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे.जिल्हा पंचायतीचे आरोग्य शिक्षण स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश गोरल यांच्या प्रयत्नातुन हा तलाव दुरुस्त केला जात आहे.
जिल्हा पंचायतीतून फुटलेला तलावाचे बांध घालून जवळपास तीन फूट खुदाई करण्यासाठी चार लाख दहा हजारांचा निधी मंजूर झाला आहे.जेष्ठ ग्राम पंचायत सदस्य वामन पाटील यांनी भूमी पूजन करत या कामाची सुरुवात केली तर रमेश गोरल यांनी कुदळ पूजन केली.
यावेळी ग्राम पंचायत सदस्य शिवाजी गोरल,राजू पावले तानाजी हलगेकर,रमेश कुंडेकर,शिवाजी पाटील राजू उघाडे बाळू गोरल विलास बेडरे आदी उपस्थित होते.
पुढच्या महिन्यांत येळ्ळूर येथील चांगळेश्वरी देवी यात्रे निमित्त याच फुटुक तलावात दरवर्षी येळ्ळूर महाराष्ट्र मैदान भरत असते राज्यातील सर्वात मोठा कुस्तीचा आखाडा याच मैदानात होत असतो आता या तलावाची दुरुस्ती होणार असल्याने महाराष्ट्र मैदानाच्या वैभवात आणखी भर पडणार आहे.
या तलावाच्या इतर बातम्यां साठी खालील लिंक क्लिक करा