बेळगाव जिल्हा रुग्णालयाचे सी एम ओ डॉ किरण गुडे यांच्यावर एका महिलेने हल्ला केल्याने संतप्त बिम्स इस्पितळाच्या तीनशे हुन अधिक कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले होते या आंदोलनामुळे रुग्णांचे हाल झाले होते.
शुक्रवारी सकाळी अकराच्या दरम्यान सिव्हिल इस्पितळ मधील डॉ किरण गुडे यांच्या अंगावरचे शर्ट पकडून महिलेने मारहाण केली.महिलेच्या नातलगाच्या मृत्यूस सिव्हिल मधील डॉक्टर कारणीभूत आहेत असा आरोप करत गुडे यांना मारहाण केली या घटनेच्या निषेधार्थ सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करत या घटनेचा निषेध केला.
नरसिंग स्टाफ शिकाऊ डाक्टर आणि इतर बिम्स संचालक रूम मध्ये आंदोलन केले शुक्रवारी दुपारी 12 ते 3 काम सेवा ठप्प झाली होती दुपार नंतर बहाल करण्यात आली.