स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत श्री संत बसवेश्वर सर्कलनजीक महिला मार्केट उभारण्याबरोबरच हॉकर्स झोन तयार केला जाणार आहे.
बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडची परिकल्पना असणाऱ्या या महिला मार्केटसाठी (एनएमटी आणि हॉकर्स झोन) 1 कोटी 21 लाख 48 हजार रुपये किंमतीची निविदा काढण्यात आली आहे.
सदर महिला मार्केट व हॉकर्स झोनच्या प्रकल्पामध्ये स्लोपींग लॉन (हिरवळ), दुकाने आणि अंतर्गत पेव्हर्सचे रस्ते यांचाही समावेश असणार आहे.