बेळगाव येथील ऐतिहासिक किल्ला तलाव हा पर्यटनासाठी केंद्रबिंदू ठरत आहे. हा तलाव मोठा असल्याने आणि येथे निसर्गमय वातावरण असल्याने दरवर्षी पक्षांचे स्थलांतर होत असते. विविध प्रकारचे पक्षी याठिकाणी येतात मात्र यावर्षी वातावरण बदलामुळे पक्ष्यांचे स्थलांतर झाले नसल्याचे दिसून येत आहे.
बेळगाव तसेच परिसरात पक्ष्यांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात होत असते. तालुक्यातही याची जाणीव होते. तळ्यांच्या ठिकाणी हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात पक्षी वास्तव्यास येतात. यंदा अजूनही अपेक्षेप्रमाणे थंडी पडली नाही. उलट थंडी संपण्याच्या मार्गावर आहे. उष्म्यात वाढ होत आहे. असे असले तरी पक्ष्यांचे स्थलांतर या वातावरण बदलामुळे झालेले नसल्याचेच दिसून येत आहे.
यावर्षी अपेक्षेप्रमाणे थंडीला सुरुवातच झाली नाही, असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. ऑक्टोबर अखेर पर्यंत पावसाने पाठ सोडली नव्हती. ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणात बदल झाल्याने पूर्वीप्रमाणे पक्षी यंदा नजरेस पडतील का अशी शंका पक्षीप्रेमी तून व्यक्त होत आहे. या गावातील किल्ला तलाव तसेच जिल्ह्यातील पाणथळ ठिकाणच्या जागी हे पक्षी स्थलांतर करत असतात. मात्र यावर्षी तसे काही दिसून आले नसल्याने पक्षीप्रेमीतून नाराजी व्यक्त झाली आहे.
दरवर्षी अनेक पक्षीप्रेमी पर्यावरणप्रेमी वेगवेगळ्या पाणथळ जागे परीक्षणासाठी जात असतात. यावर्षी ऑक्टोंबरपासून स्थलांतरित पक्ष्यांचे थवे वेगवेगळ्या पानथळी जात असतात. या वर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत पावसाने हजेरी लावल्याने या महिन्यात अपेक्षित असलेली थंडी पडली नाही. परिणामी स्थलांतरित पक्षी नोव्हेंबरअखेर येथे येऊ शकले नाहीत. त्यामुळे पक्षीप्रेमी निराशा झाले. परिणामी पक्षी पाणथळ आवरात न येता अन्यत्र कुठेच स्थलांतरित झाले आहेत का? याचा वेध घेण्याचाही प्रयत्न पक्षीप्रेमीतुन होत आहे.