इन्व्हेस्ट 2020 हा उद्योजक,गुंतवणूकदारासाठी असलेला कार्यक्रम बेळगावात घेण्याऐवजी दि 14 रोजी हुबळीला आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे बेळगाववर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करून जिल्हा भाजपचे नेते डॉ सोनाली सरनोबत आणि राजू टोप्पण्णवर या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त करून गुंतवणूकदार मेळाव्यावर बेळगावच्या उद्योजकांनी
बहिष्कार घालण्याचे आवाहन देखील केले होते.त्यामुळे भाजपची कोर कमिटी या दोघांवर शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याची चर्चा सुरू आहे.
उद्योगमंत्री जगदीश शेट्टर यांच्या दबावामुळेच गुंतवणूकदार मेळावा बेळगाव ऐवजी हुबळीला हलविण्यात आला ही वस्तुस्थिती आहे.त्यामुळे बेळगाववर अन्याय झाला आहे.म्हणून सोशल मीडियावर हुबळीच्या मेळाव्यावर बहिष्कार घाला असे आवाहन करून डॉ सोनाली सरनोबत आणि राजू टोप्पण्णवर यांनी सोशल मीडियावर व्हीडिओ देखील पोस्ट केले होते.
बेळगाव ही दुसरी राजधानी म्हणून ओळखली जाते.बेळगाववर अन्याय झाला म्हणून प्रतिक्रिया व्यक्त केली तर त्यात काय चुकले.पक्षाची भूमिका तशी आहे असे मी म्हणाले नव्हते.ते माझे वैयक्तिक मत होते.बेळगाववर अन्याय होत असेल तर गप्प बसायचे काय?माझा सरकारवर पूर्ण विश्वास असून सरकार माझी भूमिका समजून घेईल अशी प्रतिक्रिया डॉ.सोनाली सरनोबत यांनी व्यक्त केली आहे.
बेळगाव जिल्ह्यातून अधिक आमदार आणि खासदार निवडून गेले आहेत.त्यामुळे जनतेच्या देखील सरकारकडून अपेक्षा असणारच.जनतेच्या अपेक्षा सरकार पूर्ण करणार नसेल तर सरकारच्या भूमिकेला जनता कशी पाठिंबा देईल अशी चर्चा सध्या होत आहे.
विमानाची उडान योजना असो आय आय टी असो किंवा आणखी कोणता केंद्र व राज्य सरकारचा प्रोजेक्ट असो बेळगावला डावलले जाते ही भावना जगजाहीर आहे अश्यात राज्य आणि केंद्रात भाजपची सता आहे सत्ताधारी भाजप नेत्यांनी बोलून दाखवणे योग्यच आहे असेही बोलले जात आहे.