चित्रकार विविध रंगातून सगळे दर्शन घडवत असतात.विकास पाटणेकर यांची चित्रे वेगळ्या विश्वात नेतात.त्यांची चित्रे तरुण चित्रकारासाठी प्रेरणादायी आहेत.त्यांची चित्रे पाहून नवोदित चित्रकारांना प्रेरणा मिळेल.
नवोदित चित्रकारांनी अशी प्रात्यक्षिके आवर्जून पाहावीत. अशा प्रात्यक्षिकामुळे चित्रकलेतील नवीन गोष्टी पाहायला आणि शिकायला मिळतात.सदैव कार्यरत राहा असे उदगार पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी काढले.
आंतरराष्ट्रीय जलरंग चित्रकार विकास पाटणेकर यांच्या जलरंग चित्राच्या प्रात्यक्षिक प्रसंगी सीमा लाटकर प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.व्यासपीठावर सांबरा विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्या ,सरस्वती इन्फोटेकचे विनोद बामणे ,रणझुंझार ग्रुपचे अशोक मोदगेकर उपस्थित होते.सीमा लाटकर यांच्या हस्ते चित्रमहर्षी के.बी.कुलकर्णी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.नंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
सहा फूट बाय चार फूट आकाराच्या कागदावर विकास पाटणेकर यांनी निसर्गचित्राचे जलरंग प्रात्यक्षिक सादर केले.प्रारंभी पेन्सिलने चित्र काढून विकास यांनी आपल्या प्रत्यक्षिकाला प्रारंभ केला.नंतर हलक्या रंगाचा वापर करून एक टप्पा पूर्ण केला.विकास यांचे चित्रात रंग भरण्याचे कौशल्य त्यांच्या जलरंग माध्यमावरील हुकूमतीची साक्ष देत होत
सगळ्या मान्यवरांचा विकास पाटणेकर यांनी शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.याप्रसंगी आर्किटेक्ट आर.डी. शानभाग ,योगी बिरादार आणि विलास अध्यापक यांचा सत्कार करण्यात आला.चित्रकलेचे शिक्षण घेणाऱ्या धनराज कलमनी, मनोज पाटील,वैष्णवी खांडेकर,अतिफ पाच्छापुरी ,गझल कामत आणि प्रिया फडके या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.प्रारंभी नायला कोयलो यांनी उपस्थितांचे स्वागत केले.प्रत्यक्षिकाला चित्रकार,कला प्रेमी आणि कला शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.