के बी कुलकर्णी जलमशाताब्दी निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रख्यात चित्रकार वासुदेव कामत यांनी पोर्ट्रेटचे प्रात्यक्षिक सादर केले.ऍक्रिलीक रंगांचा वापर करून त्यांनी प्रात्यक्षिक सादर केले.अगोदर समोर बसलेल्या मॉडेलचे ड्रॉईंग काढून कामत यांनी प्रात्यक्षिकाला प्रारंभ केला.नंतर अत्यंत खुबीने त्यामध्ये रंग भरले.
एक रंग झाल्यावर दुसरा रंग वापरून चित्र काढण्याची प्रक्रिया सुरू ठेवली.त्यांची रंगाचा वापर करण्याची शैली त्यांच्या रंगाच्या माध्यमावरील हुकूमत दर्शवणारी होती.
विविध रंगाचा वापर करून एकमेकांत रंग मिसळून विविध रंग तयार करून त्यांनी पोर्ट्रेट पूर्ण केले .पोर्ट्रेट पूर्ण केल्यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
पोर्ट्रेट पूर्ण करण्यास दोन तासाचा कालावधी लागला.प्रात्यक्षिक सुरू असताना विविध विषयांवर बोलत,चित्रकलेतील बारकाव्यांची माहिती देत वासुदेव कामत प्रात्यक्षिक दाखवत होते.प्रसिद्ध चित्रकार रवी परांजपे,दत्तात्रय पाडेकर,विकास पाटणेकर यांच्यासह कलाप्रेमी,कला शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.
#वासुदेवकामतचित्रकार
#vasudevkamatartiest
#acriliccolourpaintings
#modelpotret
#Livepaintings
#belgaumLive
#kbkulkarnibirthcentunary