वनिता विद्यालयासमोर पदपथावरील बसवण्यात आलेले झाकण धोकादायक ठरू लागले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना इजा होऊ शकते. याचा विचार करून महानगरपालिकेने संबंधित झाकण हटवावे व तेथे नवीन झाकण बसवावे अशी मागणी होत आहे.
या पदपथावरून दररोज अनेक नागरिक ये जा करत असतात. मात्र येथील झाकण खराब झाल्याने अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याचा विचार करून महानगरपालिकेने तातडीने हे काम हाती घेण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. बाजूलाच रस्त्याचे काम सुरू असले तरीही झाकण मात्र धोकादायक ठरू लागले आहे.
महत्वाचे म्हणजे वनिता विद्यालय यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी दररोज ये-जा करत असतात. मात्र वनिता विद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच ही पदपथावरील झाकण खराब झाल्याने विद्यार्थ्यांना धोका होऊ शकतो. बसवण्यात आलेल्या झाकणाचे बार खराब झाले आहेत. ते कधी पडतील याची शाश्वती नाही. मात्र याचे सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.
सध्या वनिता विद्यालया समोरील रस्त्याचे काम जोरदार सुरू आहे. त्यामुळे सारेजण आता पदाचा वापर करू लागले आहेत. मात्र तेथे बसवण्यात आलेले झाकण खराब झाल्याने अनेकांना बाजूनी मार्ग काढावा लागत आहे. यातच विद्यार्थ्यांची धावपळ असल्याने हे झाकण धोकादायक ठरू लागले आहे. याचा विचार करून महानगर पालिकेने तातडीने सदर काम करावे अशी मागणी होत आहे.