Saturday, November 16, 2024

/

कत्ती यांची संधी हुकली-जारकीहोळी श्रीमंत पाटील मंत्रिमंडळात

 belgaum

कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील व रमेश जारकीहोळी मंत्रिमंडळ सूचित कॅबिनेट मंत्री  नियुक्ती झाली आहे तर उमेश कत्ती यांची संधी हुकली आहे.मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला असून गुरुवारी दहा जण मंत्री पदाची शपथ घेणार आहेत.अपेक्षे प्रमाणे बेळगाव जिल्ह्यातून दोघांना संधी मिळाली आहे.रमेश जारकीहोळी व श्रीमंत पाटील यांची कॅबिनेट मंत्री पदी वर्णी लागली आहे.

मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी राज्यपालांच्या कडे सोपवलेल्या दहा मंत्र्यांच्या यादीत रमेश जारकीहोळी आणि श्रीमंत पाटील यांची नावे आहेत मात्र संभाव्य मंत्री म्हणून लॉबिंग करत असलेले उमेश कत्ती यांना मात्र संधी हुकली आहे. अजून तीन ते चार मंत्री पदे बाकी आहेत त्यात उमेश कत्ती यांना संधी मिळेल का याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

Ramesh shrimant
Ramesh shrimant

रमेश जारकीहोळी यांना कॅबिनेट मंत्री पद निश्चित होते ते सर्वश्रुत आहे मात्र कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांना देखील कॅबिनेट मंत्री पद देण्यात आले आहे.कर्नाटक भाजप मधले श्रीमंत पाटील हे मराठा कोट्यातून मंत्री होणार आहेत.रमेश जारकीहोळी यांच्या मुळेच श्रीमंत पाटील हे मंत्रिमंडळात वर्णी लाऊन घेण्यात यशस्वी झाले आहेत.

अथणीचे आमदार महेश कुमटहळळी हे लिंगायत समाजाचे आहेत लिंगायत समाजाच्या मंत्र्यांची संख्या बीएस वाय येडीयुरप्पा कॅबिनेट मध्ये मोठी आहे त्यामुळे त्यांचा पत्ता कट झाला आहे.

 belgaum

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.