Monday, January 6, 2025

/

वाघ” म्हणजे दहशत नसून आपल्यासाठी आहे गर्वाची गोष्ट : कर्नाटक – गोवा वनखाते

 belgaum

चार वाघांना विष घालून ठार मारण्यात आल्याची गोव्यातील सत्तरी तालुक्यातील गोळवळी गावची घटना अद्याप मनात ताजी असताना आता एका वाघाने गोवा कर्नाटक हद्दीवर धुमाकूळ घालून पाळीव प्राण्यांना ठार मारण्याचा सपाटा लावल्याने त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. आपला अधिवास नष्ट होत असल्याने वाघांसारखे हिंस्त्र प्राणी मानव वसाहतीत शिरू लागले आहेत, ही वस्तुस्थिती असताना अलीकडे वन्यप्राण्यांची विचारून अथवा स्फोटकाद्वारे हत्या केली जात आहे. दुर्दैवाने आपला राष्ट्रीय प्राणी वाघांच्या बाबतीत हाच प्रकार घडत असल्याने वन्यप्राणी प्रेमी आणि पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

कर्नाटक गोवा सीमेवर वाघाचा मानव वसाहतींची वावर असून त्याने दोन गाई व एका रेड्याला ठार मारल्याचे सांगितले जाते. काहींच्या मते ही अफवा आहे, तर कांहीजण मानव वसाहतीनजीक आपण वाघाला प्रत्यक्ष पाहिल्याचे सांगतात. दरम्यान, गोव्यात अलिकडे तब्बल 4 वाघांना एकाच वेळी विष घालून ठार मारण्यात झाल्यामुळे वाघांच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात गोवा आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांचे वन्यजीव संवर्धन खाते सतर्क झाले आहे. खानापूर येथील जंगल भागानजीक वास्तव्यास असलेले नागरिक वन्य जीवनाचे अर्थात वन्य प्राण्यांचे हितचिंतक आहेत. त्यांच्यापैकी बहुतांश मंडळींचा वन्य प्रदेशात बेकायदा ढवळाढवळ करण्याच्या प्रकारांना तीव्र विरोध आहे. तथापि वन्य प्राण्यांकडून होणारे हल्ले आणि समाजकंटकांकडून केली जाणारी दिशाभूल याचे पर्यवसान गोवा येथे चार वाघांचा करूण मृत्यू होण्यामध्ये झाल्याचे वन्यजीवन कार्यकर्त्यांचे मत आहे.

म्हादाई वनजीवन अभयारण्याने (एमडब्ल्यूएस) केलेल्या वाघांच्या गणतीमध्ये गोव्याच्या जंगलात 5 वाघांचे वास्तव्य असल्याचे सिद्ध झाले होते. यापैकी चार वाघाना ठार मारण्यात आले आहे. वन्य जीवन अभयारण्याने संबंधित पाचही वाघ एकाच कुटुंबातील असल्याचे स्पष्ट केले आहे. सदर व्याघ्र कुटुंबातील नर-मादीचे तीन छावे मोठे झाल्यामुळे ते कुटुंबापासून विभक्त झाले होते. मादी जी या तीन छाव्यांसोबत होती, या चौघांनी एका रेड्यासह गाईला ठार मारले. त्याचे पर्यवसान या चार वाघांना विष घालून ठार मारण्यात मध्ये झाले.

म्हादाई वन्यजीवन अभयारण्य पूर्वेकडे काली राखीव व्याघ्र प्रदेश व भिमगड वन्यजीवन अभयारण्य आणि दक्षिणेकडे भगवान महावीर राष्ट्रीय उद्यान (बीएमएनपी) यांच्याशी संलग्न आहे हा जवळपास 208.5 चौरस कि. मी.चा प्रदेश हा वाघांचा कर्नाटकातील सर्वाधिक वावर असणारा प्रदेश म्हणून ओळखला जातो.

सद्यपरिस्थितीत गोवा कर्नाटक हद्दीतील जंगलात एकच वाघ शिल्लक आहे. एमडब्ल्यूएचच्या माहितीनुसार, म्हादई अभयारण्यातील एकमेव वाघाचा सध्या पाळीव प्राण्यावर हल्ला करणाऱ्या वाघाशी संबंध नाही. कर्नाटक गोवा हद्दीतील मानवी वसाहतीनजीक वावरणारा वाघ हा महाराष्ट्रातून आलेला आहे. महाराष्ट्रातील जंगलामधील स्टोन क्रशिंगच्या उद्योगामुळे त्रस्त झालेल्या तेथील वाघाने नाईलाजाने म्हादाई अभयारण्यात प्रवेश केला आहे.

पश्चिम घाट हा व्याघ्र आदिवासासाठी पोषक प्रदेश आहे वन्य प्राणी विनाकारण इतरांवर हल्ले करत नाहीत वाघ तर नाहीच नाही. सध्याचा वाघाचा मानवी वसाहतीतील प्रवेश याला मनुष्याची वन्यजीवनातील ढवळाढवळ कारणीभूत आहे. मनुष्यप्राण्याने लाकूड, खनिज आदी गोष्टींसाठी जंगलावर अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. त्याची परिणीती पर्यावरणाचे समतोल साधणाऱ्या जंगलातील हिस्त्र प्राण्यांचे मानवी वसाहतीमध्ये आक्रमण होण्यामध्ये झाले आहे. तेंव्हा स्वार्थासाठी मनुष्याने जीवनात ढवळाढवळ करू नये, असे स्पष्ट मत वन्यप्राणीप्रेमी व पर्यावरणप्रेमी जयदीप सिद्दण्णावर यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान वनखात्याने दिलेल्या माहितीनुसार, इतिहास सांगतो की आजपर्यंत एकाही वाघाने त्याला
डिवचल्याशिवाय मनुष्यावर हल्ला केलेला नाही. स्वार्थी व्यापारी आणि समाजकंटकांकडून वाघाबद्दल दिशाभूल करून त्यांना ठार मारण्याचे कृत्य केले जात आहे. “वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे. तेंव्हा वाघांची दहशत वाटण्याऐवजी खरे तर त्यांच्याबद्दल आपल्याला गर्व वाटला पाहिजे”, असे वनखात्याने म्हंटले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.