खानापूर रोड वरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या समोर टॅंकरने दुचाकीला मागून ठोकल्याने जाधव नगर येथील एका इसम जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी सकाळी आठ वाजता घडली असून परिसरात रहदारीची कोंडी झाली होती.
करण सिंग राजपूत वय 48 राहणार जाधव नगर बेळगाव हा जाधव नगर हुन उध्यमबाग कडे आपली दुचाकी घेऊन जात होता. त्याला मागून टॅंकरने ठोकरल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे रहदारीची कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती. स्टेट बँक ऑफ इंडिया समोर हा अपघात घडला आहे. नव्याने काँक्रेटीकरण केलेल्या रोडवर हा अपघात झाला आहे
स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या दिरंगाईमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. एकेरी वाहतूक सुरू असल्याने मोठी समस्या निर्माण होत असून हा अपघात याच कारणामुळे घडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडल्याने रहदारीची कोंडी झाली होती. सकाळच्या सुमारास शाळेला जाणारे विद्यार्थी व पालकांची या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. हा अपघात झाल्याने वाहतुकीची कोंडी झाली. ती सोडवण्यासाठी रहदारी पोलिसांनी प्रयत्न केले. या अपघाताची नोंद वाहतूक दक्षिण रहदारी विभाग पोलिस स्थानकात झाली आहे. पोलिसांनी सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविला आहे.