महाराष्ट्रातील राजकीय नेते सतत बेळगावात येऊन, सीमाप्रश्न प्रश्न उकरून काढतात, भडकाऊ भाषणे देतात, या महाराष्ट्रातील नेत्यावर नियंत्रण आणण्यासाठी लवकरच सुप्रीम कोर्टामध्ये पुरवणी अर्ज दाखल करण्यात येईल अशी माहिती कर्नाटक सीमा संरक्षण आयोगाचे अध्यक्ष माजी निवृत्त न्यायाधीश मंजुनाथ यांनी दिली
बेळगाव सीमाप्रश्न सुप्रीम कोर्टात असलेल्या याचिकेबाबत कर्नाटक तयारीला लागला असून, कर्नाटकाच्या वतीने बेळगावातील जिल्हा पंचायत सभागृहात विविध कानडी संघटनांची बैठक झाली.या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी मंजुनाथ यांनी विविध कन्नड संघटनांशी चर्चा करून सुप्रीम कोर्टातील केस संबंधित पुराव्याबाबत माहिती जाणून घेतली. माजी महापौर सिद्धन गौडा पाटील,महादेव तलवार अशोक चंदरगी आदी कन्नड नेत्यानी या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात येण्यास बंदी घालावी अशी मागणी केली.
महाराष्ट्रातील अनेक आमदार वरचेवर बेळगावात येत असतात, आणि ते भडकाऊ भाषणे करत असतात, असा आरोप देखील कन्नड संघटनेच्या नेत्यांनी बैठकीत केला.
यावर मंजुनाथ यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात बंदी घालण्यासाठी सुप्रीम कोर्टात पुरवणी अर्ज दाखल करु असं म्हणत 2004 साली महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली असतानाही, महाराष्ट्रातील नेते बेळगावात येऊन भाषण देत असतात., हा कोर्टाचा अवमान नाही का? यावर नियंत्रण आणण्यासाठी पुरवणी अर्ज दाखल करू असे ते म्हणाले.
सीमासंरक्षण आणि कर्नाटकला हक्काचे पाणी मिळवून देण्यास कटिबद्ध असल्याचे देखील त्यांनी नमूद केलं