अॅडव्हेंचर्स आॅफ द पाण्डव प्रिन्सेस” या सुधीर जोगळेकर लिखित पुस्तकाचा प्रकाशन समारंभ भीष्म स्मृतिदिनी लोकमान्य सोसायटीच्या सभागृहात अनेक साहित्य प्रेमींच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
लेखक सुधीर जोगळेकर यांनी हे पुस्तक आपण प्रामुख्याने पाश्चिमात्य वाचक व इंग्रजी माध्यमात शिकणारी आजची पिढी यांच्यासाठी साहसकथा या स्वरूपात लिहिल्याचे सांगितले. लिहीताना आलेले अनुभव मांडत बीटा रिडर्स, गुड रिडर्स या आधुनिक सोयींचा कसा उपयोग झाला ते सांगितले. विदेशातील लोकांना महाभारताची ओळख व्हावी म्हणून गेली काही वर्षे अभ्यास करुन ही कादंबरी लिहिल्याची माहिती त्यांनी दिली.
डॉ.नीता देशपांडे, श्री.आनंद कुलकर्णी, युवा वाचक आभा संत यांनी कांही परिच्छेदांचे वाचन करून पुस्तकाविषयी आपलं मनोगत मांडले. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले हिंदू दैनिकाचे विशेष प्रतिनिधी श्री.ऋषिकेश देसाई अध्यक्षीय भाषणात म्हणाले, प्रत्येकाच्या रुचीला भावेल असे काहीतरी महाभारतात आढळते .महाभारताच्या आवृत्याही अनेक आहेत . नवीन पिढीला रुचेल अशा विविध प्रकारातील लिखाणाची गरज त्यांनी अधोरेखित केली. आजही ही पात्रे आपल्याला भेटतात याचा उल्लेख करून ते म्हणाले, या पात्रांच्या कथांतून जीवनमूल्यांचे धडे तरुणाई घेऊनि शकते .
कुरक्षेत्र बाह्य तसेच आंतरिक युद्धही असते . आधुनिक समाजातील भ्रूणहत्या, बालविवाह, पारिवारिक कलह, स्त्रीवरील अन्याय, दूरस्थांचे विवाह, वर्ग व वर्ण संघर्ष, न्यायासाठी लढा या समस्या तेव्हाही होत्या, आजही आहेत असे ऋषिकेश देसाई म्हणाले.यावेळी डॉ.वा. पु. गिंडे यांनीही आपले विचार व्यक्त केले.