बेळगाव शहरातील संगमेश्वर भागातल्या, बाबू जगजीवनराम उद्यानाजवळील होस्टेलवर दगडफेक करून खिडक्यांच्या काचा फोडल्या आहेत. रविवारी रात्री साडे दहाच्या दरम्यान ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही समाजकंटकांनी युवकांना घेऊन हॉस्टेल वर हल्ला केला. हल्ल्या समयी युवकांच्या हातात रॉड काठ्या दगडे होती.दगडफेक करून समाज कंटकांनी घटना स्थळा वरून पोबारा केला.
त्यामुळे या परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलीस आयुक्त लोकेश कुमार, पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी आदींनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणाखाली आणली.
रविवारी झालेल्या मुलींच्या छेडछाडीच्या प्रकरणातुन त ही घटना घडल्याचे सूत्रांकडून समजते सदर दगडफेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे एपीएमसी पोलीस याचा तपास करत आहे.
या घटनेमुळे रविवारी परिसरात तणाव निर्माण झाला होता मात्र पोलीसांनी वेळीच धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली.