बेळगाव तालुक्यात सध्या दक्षिण कोरियातील केबीज बियांची मोठी क्रेझ आहे. त्यामुळे कडोली परिसरात दक्षिण कोरियाचे कोबी मोठ्या प्रमाणात लावण्यात आले आहे. मात्र इतर कंपन्यांचे कोबी जनावरांना घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे दक्षिण कोरियाच्या कोबीचा गाजावाजा करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या इतर कोबीकडेही लक्ष देण्याची गरज आता निर्माण झाली आहे.
तालुक्यातील अनेक ठिकाणी तसेच कडोली परिसरात इतर जातींच्या बियाण्यांचे लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या दक्षिण कोरियाच्या कोबीबद्दल वाहवा होत असली तरी इतर कोबीही व्यापाऱ्यांनी घ्यावेत अशी मागणी होत आहे. काही शेतकऱ्यांनी तर दर नसल्यामुळे कोबी वाया घालवले आहे. त्यामुळे त्याच्यात जनावरे सोडून ती संपवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही दिसून येत आहे.
दक्षिण कोरियातील कोबी चांगल्या पद्धतीने येत असले तरी इतर भारतीय कोबीच बियाण्यांचे काय असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे कडोली परिसरात दक्षिण कोरियाच्या कोबी बाबत चांगली अपेक्षा आहे तसेच इतर बाबतीतही रहावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
बेळगाव तालुक्यात दक्षिण कोरियाच्या काबीज बद्दल जोरदार चर्चा आणि प्रशांत करण्यात आली. मात्र कडोली परिसरात इतर कोबीच मात्र धोक्यात आली आहेत. कोबिज शेतातच पडून आहेत. त्यांना चांगल्या दर नसल्यामुळे त्याच्यावर ट्रॅक्टर फीरवण्यात आल्याचे ही घटना जुन्या आहेत. मात्र आता सध्या असलेल्या कोबीजला योग्य भाव देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक बळ सुधारावे अशी मागणी होत आहे.