केंद्र सरकारने बेळगावात स्मार्ट सिटीच्या कामना चालना दिली आहे. त्यामुळे बेळगावचा विकास होत आहे. यासाठी आता नागरीकांचे जीवन मान उंचावण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. अशी माहिती स्मार्ट सिटीचे एमडी शशिधार कुरेर यांनी दिली.
देशातील नागरिकांचे जीवनमान उंचविण्यासाठी स्मार्ट सिटी हा प्रकल्प आणला आहे. या देशातील स्मार्टसिटीमध्ये बेळगावची निवड झाली आणि शहरात विविध विकासकामे राबविली जात आहेत. ही कामे कोणत्या प्रकारे सुरू आहेत याची माहिती करून घेण्यासाठी व नागरिकांचा सहभाग घेण्यासाठी नागरिकाच ऑनलाईन अभिप्राय मागविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
स्मार्टसिटीचे एमडी शशिधर कुरेर यांनी पत्रकार परिषदेत घेऊन ही माहिती दिली. यासाठी विविध भाग करण्यात आले आहेत. शिक्षण, आरोग्य, राहणीमान, कचरा वर्गीकरण व विघटन, स्वच्छता असे विभाग करून नागरिकांना त्याचे अभिप्राय द्यावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्मार्टसिटीच्या वेबसाईटवर जाऊन नागरिक आपला अभिप्राय नोंदवू शकतात. २९ फेब्रवारी पर्यत नागरिक आपला अभिप्राय देऊ शकतात. त्याचबरोबर फेसबूक व ट्वीटरच्या माध्यमातूनही नागरिक आपला अभिप्राय सूचना देऊ शकतात. यामुळे कोणत्या सुधारणा कराव्यात याविषयीही देखील माहिती होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
स्मार्ट सीटी अंतर्गत प्रत्येक घराला १ लाख ५ हजार टॅग बसविण्यात येत आहेत. निळ्या रंगाचे हे टॅग असुन त्यामध्ये चीप बसविण्यात आली आहे. त्या चीपच्या सहाय्याने घराची माहिती मिळन्यास मदत होत असल्याचे कुरेर यानी सांगितले. यावेळी इतर अधिकारीही उपस्थित होते.