राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात कोणतं खात मुख्य नसतं तर मिळालेल्या खात्याचे संधीचं सोन करत जनतेची सेवा करणे मुख्य आहे असे मत वस्त्रोद्योग व अल्पसंख्याक कल्याण मंत्री श्रीमंत पाटील यांनी व्यक्त केलं.
मंत्री पदाचा पदभार घेताच त्यांनी पहिल्यांदा बेळगाव दौऱ्यावर आले असता विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते.बी. एस.येडियुराप्पा कॅबिनेट मध्ये श्रीमंत पाटील हे एकमेव मराठा समाजातील मंत्री आहेत.त्यांना खाते वाटपात वस्त्रोद्योग व अल्पसंख्याक कल्याण अशी दोन खाती मिळाली आहेत.अगोदर त्यांना साखर खाते देण्यात आले होते मात्र ते काढून घेऊन शिवराम हेब्बार यांना देण्यात आलं.
बेळगाव विमान तळावर माजी आमदार संजय पाटील यांनी पाटील यांचे स्वागत केलं.महेश कुमटहळळी माझे मित्र आहेत हाय कमांड त्यांना योग्य स्थान मिळेल. मला मिळालेल्या दोन्ही खात्यातील नवीन योजना बाबत अधिकाऱ्यां सोबत चर्चा करू असेही ते म्हणाले.
उमेश कत्ती यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्या बाबत चर्चा सुरू आहे साखर खाते मला नको म्हणून मीच सुचवलो होतो.17 पासून अधिवेशन सुरू होणार असून जनतेला न्याय मिळवून देणे मुख्य असते खाते महत्वाचं नसतं अस त्यांनी नमूद केलं.