बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती देवस्थानाच्या विकासासाठी 17 कोटींची योजना तयार करण्यात आली आहे.लवकरच या योजनेला मंजुरी देऊन शक्य तितक्या लवकर ही योजना सुरू करणार असल्याची माहिती मुजराई खात्याचे मंत्री कोट श्रीनिवास पुजारी यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात मुजराई खात्याची आढावा बैठक घेतल्यावर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यल्लम्मा देवस्थान परिसरात रासायनिक कुंकू,कोल्ड्रिंक हाऊसच्या नावाखाली केली जाणारी मद्याविक्री याची चौकशी करून कारवाई करण्यात येईल.राज्यातील अ दर्जाच्या मंदिरामध्ये सप्तपदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल.यासाठी यल्लम्मा देवस्थान,मायक्का देवस्थान यांची निवड करण्यात आली आहे.
मार्च 7 रोजी सप्तपदी कार्यक्रमासाठी यल्लम्मा देवस्थानात जनजागृती कार्यक्रम घेण्यात येणार आहे.राज्यात सप्तपदी कार्यक्रमाबाबत जागृती करण्यासाठी सप्तपदी रथ कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे.ट्रम्प यांच्या भारत भेटीमुळे भारताला काही फायदा झाला नाही असे सिद्धरामय्या यांनी म्हणणे चुकीचे आहे.मान्यवर व्यक्ती आपल्या देशाला भेट देतात त्यावेळी त्याचे स्वागत करणे ही आपली संस्कृती आहे असेही पुजारी म्हणाले.
धर्मादाय मंत्र्यांची दक्षिण काशीस भेट
बेळगावातील दक्षिणेचे काशी म्हणून प्रसिद्ध कपिलेश्वर मंदिराला धर्मदाय खात्याचे मंत्री कोटा श्रीनिवास पुजारी यांची सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी पहाणी करून मंदिर परिसरामध्ये जीर्णोद्धार कामाबद्दल समाधान व्यक्त करत पुढील कार्यास सर्वतोपरी लागेल ती मदत देण्याचे आश्वासन दिल.
पुजारी यांनी मंदिर ट्रस्ट च्या कार्याचा कौतुक करून समाधान व्यक्त केले सुरुवातीला स्वागत अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री दौलत साळुंखे राजू भातखंडे अभिजीत चव्हाण विवेक पाटील राकेश कलघटगी शिवशंकर मळगली दौलत जाधव आदी उपस्थित होते.यावेळी आमदार अनिल बेनके आदी उपस्थित होते.