Monday, December 23, 2024

/

जगभरातील गोरगरीब मुलांना मायेची ऊब देणारी कॅनडाची ‘एससीएडब्ल्यू’ संघटना

 belgaum

स्लीपिंग चिल्ड्रन अराउंड द वर्ल्ड (एससीएडब्ल्यू) ही कॅनडा येथील 100% धर्मादाय संघटना 6 ते 12 वर्षे वयोगटातील गोरगरीब गरजू शालेय मुलांना बेड किट्सचे मोफत वाटप करते. सदर 50 वर्षे जुन्या संघटनेतर्फे दरवर्षी जगभरातील विविध भागात शालेय मुलांना मायेची ऊब देणारा हा बेड किट्स वाटपाचा उपक्रम राबविला जातो. जगभरात यापैकी बहुतांश बेड किट्सचे वाटप रोटरी क्लबतर्फे केले जाते.

मरे ड्रायडेन आणि मार्गारेट ड्रायडेन हे उभयता स्लीपिंग चिल्ड्रन राऊंड द वर्ड (एससीएडब्ल्यू) संघटनेचे संस्थापक आहेत. एससीएडब्ल्यू संघटनेतर्फे भारतात पहिल्यांदा 50 वर्षापूर्वी पुणे येथे 6 ते 12 वर्षे वयोगटातील गरजू गरीब मुलांना मोफत बेड किट्सचे वाटप केले गेले. या उपक्रमासाठी देणगीदारांकडून प्रत्येक बेड किट मागे 35 कॅनडीयन डॉलर्स याप्रमाणे निधी गोळा केला जातो. हा निधी फक्त बेड किट्साठीच वापरला जातो बेड किट्स वितरणानंतर प्रत्येक लाभार्थींचे फोटो प्रत्येक देणगीदाराला पोच-पावतीसह पाठविले जातात. प्रशासकीय कामासाठी देणगीदार क्रांची खास बैठक बोलाविली जाते. त्यामध्ये देणगीदार आपल्यापरीने अतिरिक्त देणगी अथवा अन्य स्वरूपात मदत देऊ शकतात. दिवंगत मरे या देणगीदारांनी तर सदर उपक्रमासाठी आपले घरच एससीएडब्ल्यू संघटनेला देणगीदाखल दिले आहे. बेड किट्स उपक्रम राबविण्यासाठी एससीएडब्ल्यू संघटनेने काही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत याद्वारे लाभार्थी या उपक्रमासाठी पात्र ठरू शकतात. सदर मार्गदर्शक तत्वे पुढीलप्रमाणे आहेत – 6 ते 12 वर्षे वयोगटातील शालेय मुले – मुली, कोणतीही राजकीय शिफारस नसावी, जाती धर्माचा भेदभाव नसावा, प्रत्येक घरामागे एक बेड किट.

सदर उपक्रमांतर्गत कॅनडा येथील 6 स्वयंसेवकांचे पथक येऊन बेड किट्सचे वितरण करते. यासाठी या पथकातील सदस्य संघटनेची मदत न घेता स्वखर्चाने विविध ठिकाणी भेट देतात. रोटरी क्लब बेळगाव गेल्या 1988 सालापासून स्लीपिंग चिल्ड्रन राऊंड द वर्डच्या या बेड किट्स उपक्रमाशी संलग्न आहे. गेल्या 2008 सालापर्यंत रोटरी क्लब बेळगावने सुमारे 6000 बेड किट्सचे वाटप केले होते. 2008 मध्ये बेळगाव हे सदर बेड कीट्सच्या वितरणाचे उत्तर कर्नाटकातील मध्यवर्ती केंद्र होते. या उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ बेळगावचा एक वेगळा ट्रस्ट असून तो भारत सरकारची नोंदणीकृत आहे. केंद्र सरकारने या ट्रस्टला एफसीआरए नंबरही दिला आहे. त्यामुळे रोटरी क्लब ऑफ बेळगावला कॅनडाकडून परकीय चलनामध्ये निधी उपलब्ध होत असतो.

Canada
Canada

आतापर्यंत रोटरी क्लब बेळगावद्वारे 65,000 हून अधिक बेड किट्सचे वाटप करण्यात आलेले आहे. यंदाच्या 2019 – 20 सालात अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती सारख्या संकटांमुळे रोटरी ट्रस्टने ज्यादा बेट किट्स पाठविण्याची विनंती केली होती. त्यानुसार यंदासाठी एससीएडब्ल्यूने 8000 बेड किट्सना मंजुरी दिली आहे. बेळगाव आणि परिसरामध्ये रोटरी क्लब ऑफ बेळगाव, रामदुर्ग, निपाणी व अथणी तसेच जोडता, अळणावर येथील एकल अभियान, रोटरी क्लब ऑफ हुबळी, मुंडगोड, कुंदगोळ व रोटरी क्लब ऑफ कारवार मार्फत या किट्सचे वाटप केले जाईल. बेळगाव रोटरी क्लबतर्फे उद्या शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी 2020 रोजी 1100 बेड किट्सचे मोफत वितरण केले जाणार आहे.

एससीएडब्ल्यूच्या प्रत्येक बेडकीटमध्ये चादर, मॅट, मच्छरदानी, ब्लॅंकेट, स्वेटर, मुलींसाठी पेटिकोट आणि फ्रॉक किंवा टी-शर्ट (प्रत्येकी दोन जोड), मुलांसाठी शर्ट व हाफपॅन्ट (प्रत्येकी दोन जोड), चपला, शैक्षणिक साहित्य, स्कूल बॅग, रेनकोट, प्लास्टिक मेट आदी 15 वस्तू असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.