आज शनिवार दि. 8 फेब्रुवारी 2020 हा दिवस बेळगाव शहराने अनुभवलेला या मोसमातील सर्वाधिक थंडीचा दिवस ठरला आहे. आज शनिवारी किमान तापमान कमालीची घट होऊन ते 9 डिग्री सेल्सिअस इतके घसरले होते, जे सर्व सामान्य तापमानापेक्षा 6 डिग्री सेल्सिअसने कमी आहे.
बेळगाव शहरात शनिवारी पहाटेपासूनच थंडीचा कडाका होता. त्याचप्रमाणे दिवसभर हवेत गारठा जाणवत होता. शहरात काल शुक्रवारी 7 फेब्रुवारी रोजी कमाल तापमान 28.6 डिग्री सेल्सिअस इतके होते.
बेळगाव शहराचे किमान थंड तापमान साधारण 14 ते 15 डिग्री सेल्सियस इतके असते. मात्र आज शनिवारी ते 9.0 डिग्री सेल्सिअस इतके तापमान नोंदविले गेले.
दरम्यान हवामानाच्या अंदाजानुसार उद्या रविवार दि. 9 फेब्रुवारी 2019 रोजी बेळगाव शहराचे तापमान 11 डिग्री सेल्सियस इतके असणार आहे.