विनायक विष्णू गोदे (शास्त्रीनगर बेळगाव), काम मॉर्निंग वॉक ला जाणाऱ्यांना आरोग्यवर्धक ज्यूस देणे. या कामासाठी ते पैसे घेतात पण एक डेडिकेशन आहे. याच कामाची दखल रोटरीने घेतली आहे. सेवभावीपणाला पुरस्कार देऊन गोदे यांचा सन्मान करण्यात आला आहे.
आजच्या युगात आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. आरोग्य व्यवस्थित राखण्याचे महत्व जाणून मी काही वर्षांपूर्वी हर्बल ज्यूस ची निर्मिती करून लोकांना दाखवण्यास सुरुवात केली. सकाळी( morning walk.) येणाऱ्या लोकांना मी हे ज्यूस गेली वीस वर्ष कमी किमतीमध्ये देण्याची सेवा करून दिली. याचा खूप फायदा लोकांना झाला, त्याचा मला आनंद आहे. गोदे यांनी बेळगाव live ला ही माहिती दिली.
या हरबल ज्यूसमध्ये, गाजर, बीट, कारलं, दुधी भोपळा, तुळस, पुदिना, गव्हकुर. कडुलिंब, आवळा,. आणि इतर प्रकारचे ज्यूस आहेत. हे ज्यूस, गोमटेश कॉर्नर, याठिकाणी पहाटे 5 ते 8 , या वेळेस उपलब्ध करतात. माझ्या कामातून समाधान मिळते, एखादी सेवा प्रामाणिकपणाने सातत्याने व निष्ठेने केल्यास त्या सेवेचे निश्चित फळ मिळते. असेही त्यांनी सांगितले.
मला आज या कामाचा खूप मोठा अभिमान वाटत आहे, कारण माझ्या कामाची दखल रोटरी क्लब सारख्या संस्थेने येऊन माझा सन्मान केला, असा हा सन्मान पाहून मला असे वाटते की परमेश्वराने लोकांची सेवा करण्यासाठी जास्तीत जास्त आयुष्य द्यावं. हरबल ज्यूस ने लोकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत व्हावी, अशी इच्छा त्यांनी मांडली आहे.