पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील भुतरामहटीजवळ बुधवारी रात्री व वाजण्याच्या सुमारास बोलेरो गुसूची रस्त्या शेजारील खांब्याला धडक बसून एका महिलेचा मृत्यू झाला. तर ११ जण जखमी झाले. काकती पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे.
महादेवी भीमाण्णा हुक्केरी ( वय ४६ . रा . बडाल अंकलगी ) असे अपघातात मृत्यू मुखी पडलेल्या महिलेचे नाव असून ते बडाल अंकलगीहून चिक्कलदिनी यात्रेला जात होते. त्यावेळी हा अपघात घडला आहे. सर्व जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
कविता हुक्केरी ( वय १६ ) . निंगाप्पा पंछलकोप्प ( वय ५६ ) . दानम्मा हुक्केरी ( वय १८ ) , सावाक्वना गदग्याप्पगोळ ( वय ३५ ) प्रकाश जोगमनी ( वय १२ ) नागाण्या जोगमनी ( वय ४२ ) , नागाप्पा गदग्याप्प गौळ ( वय ५२ ) निलब्बा हुक्केरी ( वय १४ ) , महेश हुक्केरी ( वय 2 ) , राहुल हुक्केरी ( वय १२ ) विठ्ठल गद ग्याध्यगोळ ( वय ६ . सर्व रा . बहालअंबन्लगी ) अशी जखमींची नावे आहेत. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
काकती पोलीस निरीक्षक श्रीशैल कोजलगी या प्राकरणी पुढील तपास करीत आहेत. अशा घटना वाढत असून यापुढे पोलिसांनी याचा विचार करून अपघात रोखण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी होत आहे.