एका नव्या रूपात नव्या जोशात स्थापन केलेल्या चन्नम्मा पोलीस पथकाच्या कामाचे कौतुक पोलीस आयुक्तांनी केले आहेबेळगाव शहर आणि परिसरात महिला सुरक्षेसाठी हे पथक तैनात करण्यात आले होते या पथकास 20 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
गेल्या 10 फेब्रुवारी रोजी पोलीस खात्याने महिला व लहान मुलांच्या रक्षणासाठी राणी चन्नम्मा पथकाची नव्याने नियुक्त केले होते.गेल्या पंधरा दिवसात या पथकाने आपली जबाबदारी योग्य रित्या बजावली आहे.शहरातील अनेक शाळा कॉलेज उद्याने सार्वजनिक ठिकाणी जाऊन महिलांना सुरक्षेबाबत जनजागृती मार्गदर्शन केलं आहे अनेक गृहिणी व महिलांना सुरक्षा कायद्या बाबत माहिती दिली आहे या पथकाच्या मोहिमेमुळे समाज कंटकाना चांगलाच जरब बसला आहे केवळ 15 दिवसांत या पथकाने आपल्या कार्याच्या जोरावर पोलीस आयुक्तांकडून वाहवा मिळवली आहे.
या पथकाच्या कार्याची दखल घेत पोलीस आयुक्त बी एस लोकेशकुमार यांनी या पथकाला वीस हजार रुपये बक्षीस दिल आहे महिला व विद्यार्थीनींच्या रक्षणासाठी या पथकाने अजून मेहनत करावी त्यासाठी प्रोत्साहन म्हणून हे बक्षीस दिल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे.
पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक कार्यरत असून निर्भया उनाव, हैदराबाद देशभरात विविध ठिकाणी झालेले महिलांवरील अत्याचार घटना नंतर बेळगाव शहरात हे पथक कार्यरत आहे.या पथकात एक पोलीस उपनिरीक्षक चार महिला पोलिसांचा समावेश आहे