Saturday, November 16, 2024

/

मंत्री होताच रमेश यांनी केल्या दोन नव्या मागण्या

 belgaum

राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेताच अवघ्या काही तासांतच रमेश जारकीहोळी यांनी मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांच्याकडे दोन मागण्या केल्या आहेत.शपथविधी सोहळा आटोपताच त्यांनी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या कडे दोन मागण्यां केल्या आहेत.

मंत्रिमंडळ विस्तारात मंत्री पदाची संधी हुकलेले अथणीचे आमदार महेश कुमटहळळी यांना योग्य स्थान द्या व विधान सौध मध्ये डी के शिवकुमार यांना दिलेले कार्यालय मला द्या अश्या दोन मागण्या केल्या आहेत.

अनेकांत निराशा

कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तारात बेळगाव जिल्ह्याला आणखी दोन मंत्रीपदे मिळाली आहेत.रमेश जारकीहोळी आणि श्रीमंत पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने त्यांच्या मतदार संघात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

पण महेश कुमठळ्ळी आणि उमेश कत्ती यांची मात्र मंत्रीपद मिळाले नसल्याने निराशा झाली आहे.मुरुगेश निराणी देखील मंत्रिपदाची शपथ घेण्यास तयारी करून बसले होते पण त्यांच्याही पदरी निराशा आली आहे.उमेश कत्ती हे हुक्केरी मतदारसंघातून आठ वेळा निवडून आले असून मध्यंतरी त्यांनी बंडाचे निशाण हाती घेण्याचे ठरवले होते.पण मंत्रीपदाचे आश्वासन मिळाल्यामुळे ते गप्प बसले होते.

मुरुगेश निराणी देखील मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मानले जातात पण त्यांनाही मंत्रीपदापासून वंचित राहावे लागले आहे.भाजप हाय कमांडमुले कत्ती आणि निराणी याना मंत्रीपद मिळाले नाही.आता हे दोघे नाराज नेते काय पावले उचलतात हे भबिष्यात पाहावे लागणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.